दिव्यात आणखी एका नगरसेवकाची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिव्यात आणखी एका नगरसेवकाची भर
दिव्यात आणखी एका नगरसेवकाची भर

दिव्यात आणखी एका नगरसेवकाची भर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १४ : ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना शनिवारी सायंकाळी अखेर जाहीर झाली. प्रारूप प्रभाग रचनेवर आक्षेप घेत एकूण १,९६० हरकती सूचनांचा पाऊस पाडण्यात आला होता. त्याची काहीशी दखल घेऊन प्रारूप आराखड्यातील काही प्रभागांमध्ये किंचित बदल करण्यात आले आहेत. मात्र यामध्येही दिव्याला लॉटरी लागली असून येथे आणखी एक नगरसेवक वाढणार आहे. तीन पॅनेलचे तीन प्रभाग येथे तयार करण्यात आले आहेत. एकूण अंतिम प्रभाग रचनेचा आढावा घेतला असता शिवसेनेला अपेक्षित बदल झाले नसून, हा पालकमंत्र्यांनाच मोठा फटका मानला जात आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर १ फेब्रुवारी २०२२ रोजी निवडणूक आयोगाने प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. पूर्वी चार सदस्य पॅनेलने होणारी निवडणूक यावेळी तीन सदस्य पॅनेलने होणार असल्याने मोठ्या प्रभागांची मोडतोड करून एकूण ४७ प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
सर्व प्रयत्‍न फोल
ठाणेकरांनी तब्बल १,९६० हरकती निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या. त्यामध्ये तब्बल ७७६ हरकती या एकट्या कोपरी प्रभागातून होत्या. मुंब्य्रातील वाढलेली नगरसेवक संख्या कमी करून ठाण्यात नगरसेवकांचा विस्तार करावा, यासाठी पालकमंत्र्यांच्या मदतीने तत्कालीन महापौरांनी आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी जोर लावला होता. मात्र हे सर्व प्रयत्न फोल गेल्याचेच आजच्या अंतिम प्रभाग रचनेवरून दिसून येत आहे. उलट दिव्यात एक नगरसेवक वाढवून मुंब्य्रातील नगरसेवक संख्येला कुठेही हात लावण्यात आलेला नाही. त्यामुळे हरकती-सूचना नोंदवल्यानंतर अपेक्षित बदल पदरात पडेल, अशी आशा करत देव पाण्यात ठेवून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोडच झाला आहे.

कुठे, काय बदलले ?
- प्रभाग क्रमांक ११ मध्ये तारांगण, दोस्ती या इमारती समाविष्ट केल्या आहेत.
- प्रभाग क्रमांक ३, ४, ९ मध्ये किरकोळ बदल करण्यात आले आहेत.
- प्रभाग क्रमांक ४३ जो पूर्वी तन्वरनगर, चंदननगर असा होता तो आता साबे, दिवा प्रभाग म्हणून अंतिम झाला आहे.
- प्रभाग क्रमांक ४४ जे पूर्वी साबे, दिवा होता, तो आता दातिवली, बेतवडे म्हणून अंतिम झाला आहे.
- प्रभाग क्रमांक ४५ जो पूर्वी आगासन, बेतवडे होता. तो आता आगासन, बी आर नगर असा झाला आहे.
- दिव्यात आता तीन पॅनेलचे तीन प्रभाग झाले आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82285 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top