हिंदुत्वासोबतच विकासाचे काम देशपातळीवर हाती घ्यावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदुत्वासोबतच विकासाचे काम देशपातळीवर हाती घ्यावे
हिंदुत्वासोबतच विकासाचे काम देशपातळीवर हाती घ्यावे

हिंदुत्वासोबतच विकासाचे काम देशपातळीवर हाती घ्यावे

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ ः हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेहमीच भव्य असे काम केले आहे. हिंदुत्वासोबतच विकासाचे काम शिवसेनेने देशपातळीवर हाती घ्यायला हवे. राष्ट्रीय राजकारणात हिंदुत्वासोबतच विकासाच्या मुद्द्यावर केंद्रीय समितीने लक्ष घालण्याची गरज आहे, असे मत आसाम आणि मणिपूर येथील शिवसेनेच्या राज्यांच्या प्रमुखांनी व्यक्त केले.

तळागाळातील शिवसेना वाढवण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय समितीने लक्ष घालण्याची गरज आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे नेतानाच अनेक राज्यांत विकासावर काम करण्याची गरज आहे. केंद्रीय समितीने महाराष्ट्रासारखेच लक्ष इतर राज्यांतही द्यायला हवे. त्यासाठीच मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर भेटी देतानाच शिवसेना मजबूत करण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेचे आसाम राज्याचे प्रमुख रामनारायण सिंह यांनी मांडले. संजय राऊत वगळता अनेक मोठ्या नेत्यांनी राज्यात यायला हवे. त्या अनुषंगानेच निर्णय घेण्याची गरज आहे, असे त्यांनी बोलून दाखवले. 

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशातील इतर राज्यांतील हिंदूंनाही स्फूर्ती देण्याची गरज आहे, असे मत शिवसेनेचे मणिपूरचे राज्य प्रमुख एम. टोंबी सिंह यांनी व्यक्त केले. येत्या काळात वेगवेगळ्या स्थानिक निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेच्या केंद्रीय नेतृत्वाने लक्ष घालण्याची गरज आहे. शिवसेनेचे मध्यवर्ती समितीचे कार्यकर्ते हे निवडणूक जवळ आली की प्रचाराला येतात, पण ही प्रक्रिया आधी व्हायला हवी, असेही त्यांनी स्पष्ट केले. मणिपूरच्या शिवसैनिकांनाही पक्षातील मोठ्या नेत्यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82286 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top