
सीएनजीच्या दरात सवलत द्या
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : आधीच महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्याने रिक्षाचालक आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांना सीएनजी सवलतीच्या दरात द्यावा, जेणेकरून सीएनजीच्या दरवाढीनंतर भाडेवाढ होऊन सर्वसामान्यांनावर भाडेवाढ लादली जाणार नाही, अशी मागणी मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी मागणी केली आहे. त्यासाठी १७ मे रोजी बीकेसीच्या सीएनजी महानगर कार्यालयावर वाहनांसह मोर्चा काढणार असल्याचा इशाराही राव यांनी दिला आहे.
राज्य सरकारच्या धोरणानुसार सध्या इलेक्ट्रिक आणि सीएनजी वाहनांची वापर करण्याचा आग्रह केला जात आहे. मात्र त्यासाठी सवलतीच्या आणि सुविधा सरकार पुरवत नाही. त्यानंतरही मुंबई उपनगरात सर्वाधिक वाहने सीएनजीवर आधारित आहेत. मात्र, कधी काळी ५० रुपयांच्या आतमध्ये असलेले सीएनजीचे दर आता ७६ रुपये प्रतिकिलो झाले आहेत. त्यानंतरही राज्यभरातील महानगरांमध्ये सीएनजी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सीएनजीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना ‘महानगर’ने रिक्षाचालकांना सवलतीच्या दरात सीएनजी देण्याची मागणी रिक्षाचालकांकडून केली जात आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82290 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..