केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १५ (बातमीदार) ः इंधन दरवाढीपाठोपाठ घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये झालेली दरवाढ आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या केतकी चितळेच्या फोटोला जोडे मारो, शाई फेक आंदोलन करून राष्ट्रवादी काँग्रेसने अंबरनाथला घोषणाबाजी करत आंदोलन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, शहर महिलाध्यक्षा पूनम शेलार, युवती अध्यक्षा गौतमी सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीमध्ये रविवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केले.
केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे ओबीसी आरक्षण मिळू शकले नाही, गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे, दरवाढ कमी झाली पाहिजे आणि ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजे, तसेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणारी केतकी चितळे मनोरुग्ण असून तिला मनोरुग्णालयात भरती करावे आणि तिच्यावर कठोर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82307 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top