९० फुटी रस्त्यावर बालगोपाळांचा मेळा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९० फुटी रस्त्यावर बालगोपाळांचा मेळा!
९० फुटी रस्त्यावर बालगोपाळांचा मेळा!

९० फुटी रस्त्यावर बालगोपाळांचा मेळा!

sakal_logo
By

कल्याण, ता. १५ (बातमीदार) ः वाहनांच्या वर्दळीमुळे अनेकांना मॉर्निंग वॉकलादेखील बाहेर पडता येत नव्हते. मात्र, पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या ‘माय सिटी फिट सिटी’ या उपक्रमाअंतर्गत कल्याणमधील रिंग रोडवरील गांधारे ब्रिज ते बारावे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि डोंबिवली येथील पत्रीपूल ते ठाकुर्ली, ९० फुटी रेल्वे समांतर रस्ता या दोन रस्त्यांवरील एका बाजूची मार्गिका सकाळी ५ ते ८ या वेळेत फक्त सायकलिंग आणि मॉर्निंग वॉकसाठी सुरू ठेवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ज्येष्ठांसोबत सकाळी लहान-मोठी मुले सायकलिंग आणि मॉर्निंगवॉकसाठी या रस्त्यावर दिसून येत आहेत. मुलांची येथे व्यायामासाठी येणारी संख्या पाहता येथे बालगोपाळांचा मेळा भरल्याचा भास होतो आहे.
‘माय सिटी फिट सिटी’ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. अनेक महिलांनीदेखील ९० फुटी रस्त्याच्या मार्गिकेवरून सकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी पसंती दर्शविली आहे.

अनेकविध उपक्रमांबरोबरच नागरिकांचे आरोग्य, शारीरिक स्वास्थ‍य निरोगी रहावे, भावी पिढीतील म्हणजेच लहान मुलांमधील शारीरिक क्षमतेचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून आयुक्तांनी राबविलेली ‘माय सिटी फिट सिटी’ या संकल्पनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
- अविनाश मोरे, कल्याण

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82308 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top