स्वच्छ अभियान स्पर्धेत हाईडपार्क सोसायटीचा द्वितीय क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वच्छ अभियान स्पर्धेत हाईडपार्क सोसायटीचा द्वितीय क्रमांक
स्वच्छ अभियान स्पर्धेत हाईडपार्क सोसायटीचा द्वितीय क्रमांक

स्वच्छ अभियान स्पर्धेत हाईडपार्क सोसायटीचा द्वितीय क्रमांक

sakal_logo
By

खारघर, ता. १५ (बातमीदार) : पनवेल महापालिका हद्दीत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शंभराहून अधिक सदनिका असलेल्या सोसायटी स्पर्धेत खारघरमधील हाईड पार्क या सोसायटीने द्वितीय क्रमांक पटकावला. पालिकेकडून सदर सोसायटीला पंधरा हजार रुपये रोख आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. पनवेल महापालिका हद्दीत स्वच्छ भारत अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. विशेषतः आपले घर, सोसायटी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी पालिकेकडून विविध प्रकारची जनजागृती केली केली जात आहे. खारघर, सेक्टर ३४ मधील हाईड पार्क सोसायटीत शंभराहून अधिक सदनिका आहेत. तसेच या सोसायटीने ओला कचरा, सुका कचरा, परिसर स्वच्छ आदी विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला होता. त्यासाठी पालिकेकडून उद्या (ता. १६) पनवेलमधील डॉ. आंबेडकर भवनमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82315 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top