खारघरमधील पाणी समस्या सोडवावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघरमधील पाणी समस्या सोडवावी
खारघरमधील पाणी समस्या सोडवावी

खारघरमधील पाणी समस्या सोडवावी

sakal_logo
By

खारघर, ता. १५ (बातमीदार) : खारघर परिसरात पाणी समस्या गंभीर असून सिडकोने त्वरित पाणीप्रश्न सोडवावा, असे पत्र खारघर शहर मनसेचे उपाध्यक्ष गणेश बनकर यांनी सिडको आणि पालिका प्रशासनास दिले आहे. परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ज्या सोसायटीत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल, अशा सोसायट्यांना सिडकोकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, पण तोही वेळेवर मिळत नाही. काही सोसायट्यांमध्ये शंभराहून अधिक सदनिका आहेत, अशा सोसायट्यांना बाहेरून पाणी विकत घ्यावे लागत आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82322 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top