२२ मेपर्यंत वर्सोवा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२ मेपर्यंत वर्सोवा महोत्सव
२२ मेपर्यंत वर्सोवा महोत्सव

२२ मेपर्यंत वर्सोवा महोत्सव

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ ः वर्सोवा विधानसभा क्षेत्राच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्यातर्फे वर्सोवा, जोगेश्वरी पश्चिम येथील सिटी इंटरनॅशनल शाळेजवळील म्हाडा मैदानामध्ये वर्सोवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २२ मे २०२२ पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्‍घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व आमदार प्रवीण दरेकर, आमदार आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, माजी मंत्री व आमदार आशीष शेलार आणि प्रसिद्ध संगीतकार अनू मलिक उपस्थित होते. या वेळेस आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. वर्सोवा गौरव पुरस्कार सोहळ्याचेही आयोजन केले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82329 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top