युवा धोरण चर्चासत्रासाठी नोंदणीचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

युवा धोरण चर्चासत्रासाठी नोंदणीचे आवाहन
युवा धोरण चर्चासत्रासाठी नोंदणीचे आवाहन

युवा धोरण चर्चासत्रासाठी नोंदणीचे आवाहन

sakal_logo
By

धारावी, ता. १५ (बातमीदार) : यशवंतराव चव्हाण सेंटर महाराष्ट्रात गेल्या तीन दशकांहून जास्त वेळ आजतागायत विविध क्षेत्रांत अविरत कार्यरत आहे. या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. आता राष्ट्रीय युवा धोरण २०२१ च्या मसुद्याबाबत चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय युवा धोरण २०२१ चा मसुदा जारी करून हितधारकांच्या शिफारशी, दृष्टिकोन आणि मते मागविली आहेत. या धोरणाद्वारे तरुणाईची क्षमता विकसित करण्यासाठी १० वर्षांचा आराखडा सादर केला आहे. यामध्ये शिक्षण, रोजगार व उद्योजकता, नेतृत्वविकास, आरोग्य, क्रीडा व सामाजिक न्याय या बाबींवर प्राधान्य निश्चित केले आहे. त्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर युवा विभागाद्वारे राज्यभरात सहा चर्चासत्रे/ कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. ज्यामध्ये विविध सामाजिक संस्था, सामाजिक महाविद्यालये, युवा संघटना, मंडळे यांना मते मांडण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे यशवंतराव चव्हाण सेंटरचे संतोष मेकाले यांनी सांगितले. चर्चासत्रास उपस्थित राहण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संतोष मेकाले ९८६०७४०५६९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82330 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top