
निर्यातदार, आयातदारांसाठी ट्रेड एनएक्सटी पोर्टल
मुंबई, ता. १५ ः देशाला अमूल्य परकीय चलन, तसेच परदेशातील अत्यावश्यक वस्तू मिळवून देणारे निर्यातदार व आयातदार यांना हव्या असलेल्या सर्व सेवा देणारे ट्रेड एनएक्सटी हे डिजिटल पोर्टल-वेबसाईट युनियन बँकेतर्फे नुकतेच सुरू करण्यात आले.
यामुळे व्यापाऱ्यांना कमीतकमी कागदोपत्री व्यवहार करावा लागेल, ज्यायोगे त्यांचा वेळ वाचेल व सुरक्षितपणे व्यवहार करता येतील. याद्वारे लेटर ऑफ क्रेडिट, बँक गॅरेंटी, एक्सपोर्ट-इंपोर्ट बिल, एक्सपोर्ट क्रेडिटचे वितरण, अर्थसाह्य आदी अनेक बाबी सुलभतेने होतील. लहान तसेच मोठे उद्योजक आपले आयात-निर्यातीचे व्यवहार येथे एकाच ठिकाणी करू शकतील. त्यामुळे व्यावसायिकांना या व्यवहारांसाठी बँकेच्या शाखेत जायचीही गरज राहणार नाही. मुख्य म्हणजे येथे चोवीस तास केव्हाही हे व्यवहार करता येतील. तसेच ज्या व्यवहारांची माहिती उद्योजकांनी सरकारी यंत्रणेला देणे अनिवार्य आहे, ती माहितीदेखील या यंत्रणेमार्फत इंपोर्ट डाटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टिम व एक्सपोर्ट डाटा प्रोसेसिंग अँड मॉनिटरिंग सिस्टिमच्या माध्यमातून दिली जाईल. तसेच यात उद्योजकांना साह्य करणाऱ्या अन्य अनेक बाबी आहेत. त्यामुळे उद्योजकांचे काम हलके होईल.
...
ट्रेड एनएक्सटीचे फायदे...
केव्हाही कोठूनही व्यवहार
बँकेत जाण्याची किमान आवश्यकता
कागदपत्रांच्या प्रती अपलोड होतात
कागदांच्या प्रती काढणे, स्वाक्षऱ्या करणे वाचते
पुढील बिले देण्याची आठवण केली जाते
विशेष रिलेशनशिप मॅनेजर साह्य कक्ष
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82331 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..