कोपरखैरणेतील निसर्गोद्यानात फळांना बहार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपरखैरणेतील निसर्गोद्यानात फळांना बहार
कोपरखैरणेतील निसर्गोद्यानात फळांना बहार

कोपरखैरणेतील निसर्गोद्यानात फळांना बहार

sakal_logo
By

तुर्भे, ता. १६ (बातमीदार) : वाढत्या शहरीकरणातही नवी मुंबई शहराची हरित नवी मुंबई, सुंदर नवी मुंबई ही ओळख अबाधित ठेवण्यात महापालिका प्रयत्न करत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाच्या स्तुत्य कार्याचे फलित कोपरखैरणे येथील निसर्ग उद्यानाला मिळाले आहे. पालिकेने लावलेल्या झाडांना फळे लगडल्याने तेथील कर्मचारी, माळी व सुरक्षा रक्षकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ‘ग्रीन यात्रा’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कोपरखैरणे येथील सेक्टर १४, निसर्गोद्यानात ४० हजार वृक्षांचे मियावाकी पद्धतीचे अतिशय समृद्ध शहरी जंगल सीएसआर निधीतून निर्माण करण्यात आले आहे. सन २०२२ मध्येही हाच वेग कायम राखत शहरात सात ठिकाणी १ लाख ४ हजारपेक्षा अधिक रोपांची मियावाकी पद्धतीने लागवड करण्यात आली आहे. यामध्ये निसर्गोद्यानातील मियावाकी शहरी जंगलात आधीच्या ४० हजार रोपांत आणखी २० हजार देशी प्रजातींच्या रोपांची भर घालण्यात आली आहे. कोपरखैरणे भागात उद्यान विभागाद्वारे निसर्ग उद्यानात करण्यात आलेल्या वृक्षलागवडीने परिसरात मोठे अमृतवन निर्माण झाले आहे.

फुलझाडांसोबत फळझाडेही
महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे निसर्ग उद्यानात अमृतवन तयार करण्यात आले. विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. येथे लावलेल्या झाडांची तीन वर्षांत चांगली वाढ झाली आहे. येणाऱ्या काळात हा संपूर्ण परिसर विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडांनी बहरून निघणार आहे. या ठिकाणी लागवड करण्यात आलेल्या आंब्याच्या झाडांना आंबे लागले आहेत.

पशू-पक्ष्यांसाठी मोठा निवारा
फळ आणि फुलझाडांच्या वनआच्छादनाने परिसरात पशू-पक्ष्यांसाठी मोठा निवारा निर्माण केला आहे. उद्यानात खारुताईच्या मुक्त संचारासोबतच झाडांवर विविध पक्ष्यांची घरटी दिसून येतात. ही फुलझाडे, फळझाडे बहरल्यानंतर या परिसरात आणखी पक्ष्यांची संख्या वाढून हे स्थळ पक्ष्यांसाठी नंदनवनच ठरेल, अशी आशा उद्यान विभागातील कर्मचारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82380 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top