प्रधानमंत्री आवास योजनेवर आता सरकारचे नियंत्रण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रधानमंत्री आवास योजनेवर आता सरकारचे नियंत्रण
प्रधानमंत्री आवास योजनेवर आता सरकारचे नियंत्रण

प्रधानमंत्री आवास योजनेवर आता सरकारचे नियंत्रण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. त्यानुसार म्हाडा प्राधिकरणाने तपासणी, छाननी केलेल्या प्रस्तावांना शासनमान्यता घेणे अनिवार्य केले आहे. तसेच सिडको, एमएमआरडीए, एनएमआरडीए, पीएमआरडीए आदी प्राधिकारणांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या प्रस्तावांना म्हाडा प्राधिकरणामध्ये स्थापन केलेल्या तांत्रिक कक्षामार्फत छाननी करावी लागणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेला केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे राज्यातील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेले प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तसेच त्यामध्ये सुसूत्रता राहण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा गृहनिर्माण विभागाचा विचार होता. त्यानुसार या कार्यपध्दतीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या योजनेवर सरकारचे नियंत्रण असावे, यासाठी म्हाडा प्राधिकरणाने तपासणी, छाननी केलेले प्रस्ताव एसएलएसी, एसएलएसएमसी व सीएसएमसी या समित्यांची मान्यता घेण्यापूर्वी आलेल्या प्रस्तावांना सरकारची मान्यता घेणे बंधनकारक केले आहे.

तसेच म्हाडा प्राधिकरणामध्ये अस्तित्वात असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या तांत्रिक कक्षात १ मुख्य अभियंता, २ कार्यकारी अभियंते, २ उपअभियंते, २ लिपिक-टंकलेखक तसेच लेखा शाखेसाठी १ उपलेखा अधिकारी आणि १ लिपिक- टंकलेखक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे म्हाडा मंडळ स्तरावर देण्यात येणाऱ्या सर्व परवानग्या या प्रधानमंत्री आवास योजनेच्या तांत्रिक कक्षामार्फत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेतून निर्माण होणाऱ्या घरांची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने सिडको, एमएमआरडीए, एनएमआरडीए, पीएमआरडीए आदी प्राधिकरणांमार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची म्हाडा प्राधिकरणामध्ये स्थापन केलेल्या तांत्रिक कक्षामार्फत छाननी करण्याच्या सूचनाही गृहनिर्माण विभागाने दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82397 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top