बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई
बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई

बेशिस्त अवजड वाहनांवर कारवाई

sakal_logo
By

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : मिरा-भाईंदरच्या हद्दीत क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी ११ हजार ८२० अवजड वाहनांवर कारवाई करून ५८ लाख ३१ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
अवजड वाहनात क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणि मिरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवून पोलिसांनी या वाहनांवर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही कारवाई केली जात आहे. दुचाकींना कर्णकर्कश्श आवाजातील सायलेन्सर बसवण्याचे तरुणांचे वेड वाढत आहे. अशा दुचाकींवरही कारवाईचा बडगा पोलिसांनी उचलला आहे. आतापर्यंत २२१ दुचाकींवर कारवाई करून त्यांच्याकडून २ लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82423 Txt Palghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top