
बुद्धजयंतीनिमित्त व्हीलचेअरचे वाटप
धारावी, ता. १६ (बातमीदार) : अज्ञान रिसर्च आणि एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते व्हीलचेअरचे वाटप वांद्रे येथील शासकीय निवासस्थानी रविवारी (ता. १५) करण्यात आले.
गौतम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष विजय शंकर शेट्टी यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला. मुंबईतील रिपाइंचे पदाधिकारी किसन रोकडे, नागेश तांबे, बंजारा आघाडीचे बाबूसिंग राठोड, मातंग आघाडीचे तुषार कांबळे, सुदेश कडवे आदींना हे वाटप करण्यात आले. ते सर्व जण अपंग गरजूंना त्या वाटणार आहेत. बाकीच्या व्हीलचेअर रुग्णालयात देण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे पर्यावरण आघाडी मुंबई अध्यक्ष व रिपाइं मुंबई उपाध्यक्ष आणि अज्ञान रिसर्च आणि एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष शेट्टी यांनी प्रसार माध्यमांना दिली. रतन अस्वारे, योगीराज भोसले, बाळा वाघमारे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82429 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..