अर्थपान - ईव्हीट्रिक मोटर्सने १०० डीलरशिपचा टप्पा गाठला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अर्थपान - ईव्हीट्रिक मोटर्सने १०० डीलरशिपचा टप्पा गाठला
अर्थपान - ईव्हीट्रिक मोटर्सने १०० डीलरशिपचा टप्पा गाठला

अर्थपान - ईव्हीट्रिक मोटर्सने १०० डीलरशिपचा टप्पा गाठला

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : ईव्हीट्रिक मोटर्स हा भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर उद्योगातील जगातील आघाडीच्या ब्रँडपैकी एक आहे. कंपनीने अवघ्या ६ महिन्यांच्या कालावधीत संपूर्ण भारतात १०० डीलरशिपचा अविश्वसनीय टप्पा गाठला आहे. सध्या राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पश्चिम बंगाल आणि बिहार या राज्यांमध्ये ईव्हीट्रिक स्कूटर उपलब्ध आहेत. या ब्रँडची टायर २ आणि टायर ३ बाजारपेठांमध्ये आणि अगदी देशाच्या बहुतांश अंतर्गत भागांमध्ये मोठ्या प्रमाणात डीलरशिपमध्ये वाढ झालेली आहे. यामुळे आग्रा, वाराणसी, अलिगढ, जोधपूर, बिकानेर, सुरत इत्यादी मेट्रो शहरांच्या पलीकडे जाऊन अंतर्गत असलेल्या शहरांमध्येदेखील उपस्थित आहे. कोविड-१९ महामारीमुळे जागतिक स्तरावर एकात्मिक ऑटोमोटिव्ह उद्योगाला जबरदस्त झळ पोचली असतानादेखील, कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे ब्रँडने हळूहळू भारतातील जवळजवळ प्रत्येक महत्त्वाच्या राज्यात आणि शहरात मजबूत नेटवर्क तयार केले असल्‍याचे, ईव्हीट्रिक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी मनोज पाटील म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82452 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top