बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी
बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

sakal_logo
By

चेंबूर, ता. १६ (बातमीदार) ः कोरोनाचे सावट असल्याने गेल्या दोन वर्षांत तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात आली होती. मात्र या वेळी बौद्ध अनुयायांच्या वतीने उपनगरात बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
मुंबई उपनगरात बौद्ध अनुयायांची मोठी लोकसंख्या आहे. चेंबूर, कुर्ला, विक्रोळी, सायन, टिळकनगर, माहूल येथे या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. उपनगरात सोल्ये बौद्ध विकास मंडळ, नेस्ट व सेव्ह, मंथन, सिद्धार्थ कॉलनी घर हक्क समिती, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या वतीने प्रबोधनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम, गायन, वादन, वक्तृत्व, चित्रकला, नृत्यस्पर्धा आदी कार्यक्रम राबवले गेले. माजी आमदार विद्या चव्हाण, डॉ. राम मेस्त्री, चंद्रकांत हंडोरे, तहसीलदार शीतल जाधव, समाजसेवक विशाल हिवाळे, गट अध्यक्ष दिलीप तांबे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82462 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top