भिवंडीतील ग्राहकांना वीजबिलाचे व्याज माफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीतील ग्राहकांना वीजबिलाचे व्याज माफ
भिवंडीतील ग्राहकांना वीजबिलाचे व्याज माफ

भिवंडीतील ग्राहकांना वीजबिलाचे व्याज माफ

sakal_logo
By

भिवंडी, ता. १६ (बातमीदार) ः राज्य सरकारच्या महावितरण कंपनीने मार्च महिन्यात जाहीर केलेल्या विलासराव देशमुख अभय योजनेमुळे वीजग्राहकांना थकीत वीजबिलावरील व्याज पूर्णपणे माफ होणार असून केवळ मूळ थकबाकीची रक्कम भरण्याची सोय केली आहे. ही थकबाकी टोरेंट पॉवर कंपनीच्या ग्राहक केंद्रात यंत्रमागधारक वीजग्राहकांना भरता येणार आहे, अशी माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी चेतन बदियानी यांनी दिली आहे.
भिवंडी शहरात मोठ्या प्रमाणात वीजबिल थकबाकी वाढल्याने शासनाने भिवंडीत वीज वितरण आणि वीजबिल वसुली करण्याची फ्रॅन्चायझी टोरेंट पावर कंपनीला दिली. त्यावेळेपासून शहरातील अनेक वीजग्राहकांच्या वीजबिलाच्या थकबाकीवर वीज वितरण विभागाकडून झालेल्या व्याज आकारणीमुळे वीज थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत गेला. त्यामुळे शहरातील नागरिकांना वीजबिल भरण्याची इच्छा असतानाही वीजबिल भरता आले नाही. त्यामुळे थकबाकीत वाढ होऊन मूळ थकबाकीही वसूल न झाल्याने राज्य शासनाच्या निर्देशानुसार महावितरणने विलासराव देशमुख अभय योजना जाहीर केली आहे. वीजबिलाच्या मूळ थकबाकीवरील व्याज पूर्णपणे माफ केले आहे. दरम्यान, जे ग्राहक एकाच वेळी संपूर्ण थकबाकी भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हप्त्यांचा पर्यायही महावितरणने प्रदान केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82474 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top