ग्रामीण भागासाठी २५२ विंधन विहीरी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागासाठी २५२ विंधन विहीरी मंजूर
ग्रामीण भागासाठी २५२ विंधन विहीरी मंजूर

ग्रामीण भागासाठी २५२ विंधन विहीरी मंजूर

sakal_logo
By

ठाणे, ता. १६ ः ठाणे जिल्ह्यात उद्भवणाऱ्या पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यामतून विविध उपाययोजना करण्यात येत असतात. त्यानुसार दरवर्षी पाणीटंचाई आराखडाही तयार करण्यात येत असतो. यंदाच्या वर्षीही पाणीटंचाई आराखड्यात पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात आला असून दोन टप्प्यांत २५२ विंधन विहिरींना मंजुरी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी ६९ विंधन विहिरींच्या खोदाईची कामे पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे.
ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीत पाणीटंचाईग्रस्त गाव-पाड्यांना टँकरने पाणी पुरवण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असते. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली एप्रिल महिन्यापासून ते अगदी जून-जुलैपर्यंत पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येत असतो. त्यानुसार यंदाच्या वर्षीही पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये टँकर किंवा बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, विहिरी खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे, विंधन विहिरींची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाईची समस्या निवारण्यासाठी विंधन विहिरींवर विशेष भर देण्यात येत असतो. त्यात यंदाच्या वर्षी पहिल्या टप्प्यात ८८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १६४ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार ६९ विहिरींच्या खोदाईचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्यास व पाणीपुरवठा करण्यासाठी लागणाऱ्या टँकरची संख्याही कमी होण्यास मदत होणार आहे.

पालिकांवर पाणीटंचाईचे सावट
ठाणे हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात भातसा, तानसा आणि बारवी अशी मोठी धरणे आहेत. त्यात मागील वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस झाला असून धरणांच्या साठ्यातही वाढ झाली होती. त्यात मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलांमुळे वाढलेली उष्णता, त्यामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन यांमुळे जिल्ह्यातील महापलिका क्षेत्रांवर पाणीटंचाईची टांगती तलवार आहे. दुसरीकडे पाण्याची तहान भागविणाऱ्या तालुक्यांमधील अनेक गावपाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

तालुका पूर्ण झालेल्या विंधन विहिरी

भिवंडी ०४

शहापूर ००

मुरबाड २१

कल्याण ००

अंबरनाथ ४४

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82477 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top