मुलांना भिंती रंगवू द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलांना भिंती रंगवू द्या
मुलांना भिंती रंगवू द्या

मुलांना भिंती रंगवू द्या

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १७ (बातमीदार) : पालकांनी मुले पाच वर्षांची होईपर्यंत भिंतींना रंग लावू नये, कारण मुले भिंती रंगवत असतात. त्यांना त्या स्वच्छंदपणे रंगवू द्यायला हव्यात, असा मोलाचा सल्ला विश्वविख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी गोरेगावात सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेत दिला.
चाळीस वर्षांपासून सुरू असलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शेवटच्या दिवशी वासुदेव कामत यांनी ‘माझ्या भिंती- माझी चित्रे’ या विषयावर स्लाईड-शोसह व्याख्यान दिले. भिंतीवर चित्रांचे काय महत्त्व आहे, याची त्यांनी श्रोत्यांना जाणीव करून दिली. ते म्हणाले, भितींना जिवंतपणा येतो तो चित्रांमुळे! मुले पाच वर्षांची होईपर्यंत भिंतींना रंग लावू नये. कारण मुले भिंती रंगवत असतात. त्यांना त्या स्वच्छंदपणे रंगवू द्या. शाळा चित्रकलेच्या स्पर्धेत जे विषय मुलांना देतात, त्यावर मोठ्यांना चार ओळी लिहिता येणार नाहीत. मुलांना त्यांच्या मनातील चित्रे काढू द्या. तेव्हाच त्यांच्यातील कलाकार खुलून बाहेर येईल. आज अनेक लोक शिल्पकला व चित्रकलेपासून दुरावले आहेत. याची अनेक कारणे असतील; पण महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यातला चित्रकार मारला गेलेला असतो. बालपणी जेव्हा व्यक्ती घडत असते त्या वेळी पालक व शिक्षक मंडळी त्यांनी काढलेल्या चित्रांना नावे ठेवून त्यांचा उत्साह नकळत मारतात. मग चित्रकलेपासून मुले लांब जातात. कोणाचीच कला लगेच अवगत होत नाही. त्यासाठी सराव करावाच लागतो.
...
चित्रांवर बोलण्याचे भाग्य लाभले!
वसंत व्याख्यानमालेत अनेक विद्वानांनी हजेरी लावली. त्यात माझेही नाव आज जोडले गेले याचा एक वेगळा आनंद वाटतो. विशेष म्हणजे भगवान बुद्ध हे माझे आराध्य दैवत आहे. आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मला चित्रांवर बोलण्याचे भाग्य लाभले आहे, असे ते म्हणाले. यादरम्यान त्यांनी भगवान बुद्धांची अप्रतिम चित्रे दाखवली. त्याचबरोबर निसर्ग चित्रे, संकल्पना चित्रे, प्रसंग चित्रेही दाखवली. पसायदान म्हणणाऱ्या मुलांना वासुदेव कामत यांच्या हस्ते बक्षीस म्हणून रंगवाटप केले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82558 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top