पनवेलमध्ये ११७७ श्रीसदस्यांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पनवेलमध्ये ११७७ श्रीसदस्यांचे रक्तदान
पनवेलमध्ये ११७७ श्रीसदस्यांचे रक्तदान

पनवेलमध्ये ११७७ श्रीसदस्यांचे रक्तदान

sakal_logo
By

पनवेल, ता. १७ (प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील विरुपाक्ष सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी १,१७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानमार्फत सोमवारी (ता. १६) घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर कार्यक्रमामध्ये श्रीसदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या रक्ताची भासत असलेली गरज दूर करण्यासाठी हे रक्तदान शिबिर राबविण्यात आले. रक्तदान करण्यासाठी दासभक्तांनी सकाळपासूनच शिस्तबद्ध पद्धतीने आपला सहभाग घेतला होता. या वेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबन पाटील, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक राजू सोनी, सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेविका रूचिता लोंढे, डॉ. ययाती गांधी, त्याचबरोबर डी. वाय. पाटील, एम. जी. एम., तेरणा हॉस्पिटलचे डॉक्टर व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82559 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top