
चाकूचा धाकाने बलात्कार करणारे आरोपी जोरबंद
धारावी : गेल्या आठवड्यात धारावी परिसरात १९ वर्षीय विवाहित महिलेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. ११ मे रोजी या प्रकरणाचा धारावी पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. याप्रकरणी धारावी पोलिसांनी दोन्ही आरोपींना जेरबंद केले आहे.
दोन्ही आरोपी मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेतील प्रेमनगर येथील रहिवासी आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा महिला घरात झोपली होती. घराचा दरवाजा उघडा होता. त्याचा फायदा घेत आरोपी घरात घुसले. पीडित महिलेचे सासरे घराचा दरवाजा बंद न करता घराबाहेर फिरायला गेल्यामुळे दरवाजा उघडा राहिला होता.
दोन्ही आरोपींनी पीडितेला चाकूचा धाक दाखवून बलात्कार केला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. पीडित महिलेने सांगितले की, एक आरोपी मोबाईलवर व्हिडीओ बनवत होता. पीडित महिलेने सांगितले की, दोघांचे वय ३० ते ३५ वर्षांदरम्यान आहे. याप्रकरणी धारावी पोलिस ठाण्यात ११ मे रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बळवंत पाटील यांनी सांगितले की, आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांच्या टीम प्रयत्नांची पराकाष्ठा करत होती. अखेर पोलिसांच्या प्रयत्नांना यश येऊन सोमवारी (ता. १६) आरोपींना पकडण्यात आले. न्यायालयाने २३ मेपर्यंत आरोपींना पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82561 Txt Mumbai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..