संत रोहिदास मार्गावर दुरुस्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संत रोहिदास मार्गावर दुरुस्ती
संत रोहिदास मार्गावर दुरुस्ती

संत रोहिदास मार्गावर दुरुस्ती

sakal_logo
By

धारावी, ता. १७ (बातमीदार) : धारावीतील संत रोहिदास मार्गावरील प्रबुद्ध समता इमारतीसमोरील रस्त्याचा काही भाग सखल झाला होता. दरवर्षी पावसाळ्यात या सखल झालेल्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत होते. याचा फटका वाहतुकीस बसत होता. सखल झालेल्या भागातून हलकी व जड वाहने नेताना वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. अनेकदा दुचाकीस्वार सखल भागात आदळून जखमी होण्याच्या घटना घडल्या होत्या. या ठिकाणी पावसाचे पाणी साचल्यावर वाहतूक कोंडी होत होती. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी पालिकेने पावसाळ्याअगोदर रस्त्याच्या कामास सुरुवात केल्याने यंदा पावसाळ्यात पावसाचे पाणी साचणार नाही, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82563 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top