चोरी करताना इमारतीवरून पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news thief died after falling from the building mumbai
चोरी करताना इमारतीवरून पडून मृत्यू

चोरी करताना इमारतीवरून पडून मृत्यू

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली पूर्वेतील भोईरवाडी येथील वसाहतीत सोमवारी रात्री दोन चोरटे चोरी करायला गेले; मात्र तेथील सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात येताच दोघांनी पळून जायचा प्रयत्न केला. या वेळी इमारतीच्या ड्रेनेज पाईपच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना चोरटा मोहम्मद भाटकर (२४) याचा पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर पडून मृत्यू झाला; तर दुसरा चोरटा अरफाह पिणारी (२२) हा जखमी झाला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडीएमसीचे बीएसयूपी योजनेअंतर्गत अनेक गृहप्रकल्प तयार आहेत; मात्र तेथे कोणी राहावयास न गेल्याने ते धूळखात पडून आहेत. हीच बाब चोरांच्या पथ्यावर पडत असून येथील भंगार, लोखंडी सामानाप्रमाणे लिफ्टदेखील चोरांनी चोरून नेल्याची घटना यापूर्वी घडली आहे. सोमवारी रात्रीची घटना या वसाहतीतील इमारत क्र. ४ मध्ये घडली. न्यू गोविंदवाडी परिसरात राहणारे अरफाह व मोहम्मद रात्री १२ च्या सुमारास वसाहतीत इलेक्ट्रिक वायर चोरी करण्यासाठी गेले होते. तेथील सुरक्षा रक्षकाच्या ही बाब लक्षात येताच त्याने या दोघांना हटकले. सुरक्षारक्षक या दोघांना बघायला गेला असता दोघांनी पळण्याचा प्रयत्न केला. याच वेळी ड्रेनेज पाईपलाईनच्या सहाय्याने आठव्या मजल्यावरून खाली उतरत असताना मोहम्मदचा पहिल्या मजल्यावरील स्लॅबवर पडून मृत्यू झाला; तर अरफाह हादेखील जखमी झाला.

मृत चोरटा सराईत गुन्हेगार
सुरक्षा रक्षकाने तत्काळ टिळकनगर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षक आर. एन. करौती यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत अरफाह याला अटक केली आहे, तर मोहम्मद याचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पालिका रुग्णालयात पाठवला आहे. मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात यापूर्वीदेखील अनेक गुन्हे नोंद असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त जयराम मोरे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82583 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top