कारला अपघातात महिलेसह दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारला अपघातात महिलेसह दोघे जखमी
कारला अपघातात महिलेसह दोघे जखमी

कारला अपघातात महिलेसह दोघे जखमी

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : सीबीडी-बेलापूरकडून पामबीच मार्गावरून वाशीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव आय-२० कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार झाडावर धडकून भीषण अपघात झाला. त्यात कारमधील महिलेसह दोघे जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी मध्यरात्री सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ घडली. या अपघातात कारच्या दर्शनी भागाचा अक्षरश: चुरा होऊन कारचे मोठे नुकसान झाले. या अपघातातील दोघा जखमींवर वाशीतील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
या घटनेतील जखमी मुस्तफा शेख व त्याच्यासोबत असलेली महिला हे दोघेही सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आय-२० कारने पामबीच मार्गावरुन सीबीडी-बेलापूर येथून वाशीच्या दिशेने जात होते. ही कार सानपाडा येथील मोराज सर्कलजवळ आली असताना, भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. कारचा वेग प्रमाणापेक्षा जास्त असल्याने या अपघातात कारच्या पुढील भागाचा चुरा होऊन कारचे मोठे नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने कारमधील दोघा जखमींना बाहेर काढून त्यांना वाशीतील एमजीएम रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले. या अपघातातील दोघे जखमी बोलण्याच्या स्थितीत नसल्याने पोलिसांनी अद्याप त्यांचा जबाब नोंदवून घेतलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी या अपघाताप्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद केलेली नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82642 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top