मुंबई महानगरपालिकेच्या लवृक्ष छाटणी मोहिमेला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई महानगरपालिकेच्या लवृक्ष छाटणी मोहिमेला वेग
मुंबई महानगरपालिकेच्या लवृक्ष छाटणी मोहिमेला वेग

मुंबई महानगरपालिकेच्या लवृक्ष छाटणी मोहिमेला वेग

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई ता. १७ : मुंबईत पावसाळ्याच्या तोंडावर वृक्ष छाटणीच्या मोहिमेला वेग आला आहे. शहरात तसेच उपनगरात मुंबई पालिकेने नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामाला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणजे अनेक ठिकाणी वृक्षांच्या फांद्या छाटण्यासोबतच धोकादायक स्थितीतील फांद्या छाटण्याचीही मोहीम पालिकेने हाती घेतली आहे.
मुंबईतील अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती असणाऱ्या वृक्षांच्या बाबतीत नागरिकांकडून विविध माध्यमातून तक्रारी येत आहेत. त्याला मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासन संयुक्तपणेही काही ठिकाणी वृक्ष छाटणीची कामे करत आहे.
मध्य रेल्वे आणि हार्बर मार्ग मिळून एकूण १०४ ठिकाणी तर, पश्चिम रेल्वे मार्गावर २२ ठिकाणी अशा एकूण १२६ ठिकाणी रेल्वे प्रशासनाने वृक्ष छाटणी करण्याची मंजुरी महापालिकेकडे मागितली होती. तसेच यातील पालिका हद्दीतील ठिकाणांवर वृक्ष छाटणीसाठी सहाय्य करण्याची विनंती देखील केली होती. त्यानुसार झाडांच्या फांद्या छाटण्याची कामे देखील महापालिका आणि रेल्वे प्रशासन मिळून वेगाने करीत आहे. पावसाळ्यात दरवर्षी मुंबई महापालिकेच्या हद्दीतल वृक्ष किंवा फांद्या कोसळल्याने अपघाताच्या घटना घडतात. अनेकदा या घटनांमध्ये नागरिकांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळेच मान्सूनपूर्व कामाअंतर्ग पालिकेकडून वृक्ष छाटणीची मोहीम हाती घेण्यात येते.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82661 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top