मंत्र्यांचे बंगले काही काळ अंधारात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंत्र्यांचे बंगले काही काळ अंधारात
मंत्र्यांचे बंगले काही काळ अंधारात

मंत्र्यांचे बंगले काही काळ अंधारात

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ ः बेस्ट उपक्रमाच्या पुरवठ्यात आज तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंत्रालयासमोरील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बंगल्यांची वीज काही काळ बंद पडल्याने मोठी तारांबळ उडाली. बत्ती गुल झाल्याने अनेक मंत्र्यांच्या घरामध्ये अंधार झाल्याचे चित्र होते. दिवसभरात दोनदा वीज गेल्याने गोंधळ उडाला. सायंकाळी सातनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

बेस्ट उपक्रमाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता मरीन ड्राइव्ह रिसिव्हिंग स्टेशनमध्ये पहिला तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे मंत्रालयाजवळील परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागाने तांत्रिक बिघाड दूर करत ६० ते ७० टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचेही त्याने सांगितले.

बेस्टच्या दक्षिण मुंबईतील नेटवर्कमधून मंत्रालयापासून अनेक शासकीय कार्यालयांना वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासोबतच मंत्रालयासमोरील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या बंगल्यातही वीज पुरवण्यात येते. आज दिवसभरात दुसऱ्यांदा या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.

दोन वेळ वीज गायब
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता; पण दीड तासाने म्हणजे सायंकाळी ७ वाजता १०० टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे जनता संपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82668 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top