मुंबई-दिल्ली ‘राजधानी’ची सुवर्णमहोत्सवी दौड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई-दिल्ली ‘राजधानी’ची सुवर्णमहोत्सवी दौड
मुंबई-दिल्ली ‘राजधानी’ची सुवर्णमहोत्सवी दौड

मुंबई-दिल्ली ‘राजधानी’ची सुवर्णमहोत्सवी दौड

sakal_logo
By

मुंबई, ता. १७ : मुंबई-नवी दिल्ली धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला मंगळवारी (ता. १७) ५० वर्षे पूर्ण झाली. ५० वर्षांपूर्वी १७ मे १९७२ रोजी बॉम्बे सेंट्रल ते दिल्ली मार्गावर राजधानी एक्स्प्रेस पहिल्यांदा धावली होती. ट्रेन क्रमांक १५१ मुंबईतून १७ मे १९७२ रोजी सायंकाळी ४.२० वाजता सुटली होती आणि दिल्लीला दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पोहोचली होती. आज ५० वर्षपूर्तीनिमित्त झालेल्या सोहळ्यात ट्रेनच्या आठणींना उजाळा देण्यात आला.
पूर्णपणे वातानुकूलित असलेली राजधानी एक्स्प्रेस सर्वांत पहिल्यांदा दिल्ली ते हावडा मार्गावर सुरू झाली. तोपर्यंत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून फ्रंटियर मेल आणि पश्चिम एक्स्प्रेस अशा दिल्लीवरून जाणाऱ्या गाड्या होत्या. दिल्ली शेवटचा थांबा असलेली एकही गाडी नव्हती. त्यानंतर तीनच वर्षांमध्ये मुंबई-दिल्ली अशी राजधानी एक्स्प्रेस सुरू झाली. भारताच्या व्यापारी राजधानीला राजकीय राजधानीशी जोडण्यासाठी प्रिमिअर पॅसेंजर ट्रेन म्हणून सुरू झालेला दिवस भारतीय रेल्वेच्या इतिहासातील ऐतिहासिक आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले.

एक्सप्रेसची वैशिष्ट्ये
- १७ मे १९७२ मध्ये अप-डाऊन मार्गावर राजधानी एक्सप्रेस मुंबई-दिल्ली मार्गावर सुरू
- ट्रेनमध्ये चार चेअर कार, एक एसी फर्स्ट क्लास, दोन एसी स्लीपर कोच आणि आठवड्यातून दोन दिवस सेवा
- २ सप्टेंबर १९८१ मध्ये राजधानीचे कोच वाढवून १८ करण्यात आले. तेव्हा दोन इंजिन लावून राजधानी धावत होती
- २ ऑक्टोबर २००० पासून राजधानी एक्सप्रेस रोद धाऊ लागली
- १५ डिसेंबर २००३ मध्ये राजधानी एक्सप्रेसला एलएचबी कोच लावण्यात आले

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82674 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top