मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य
मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य

मोकळ्या जागेत बांधकाम साहित्य

sakal_logo
By

तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : शहरातील कचरा वाहतूक करण्यासाठी गल्लीगल्लीत कचरा वाहतूक करणारी वाहने कार्यरत असतात. घणसोली परिसरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य रस्त्यावरच टाकल्याने कचरा वाहतूक वाहनांना गल्लोगल्ली जाण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे कचरा वाहतूक करणारे कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशात प्रथम मानांकन मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. म्हणून पालिकेकडून शून्य कचराकुंडी अभियानांतर्गत कचराकुंड्या काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे गल्लोगल्ली कचरा वाहतूक करणारी वाहने फिरून घराघरातील कचरा वेचत आहेत. कचरा गोळा केल्यावर तुर्भे येथील क्षेपणभूमीत विसर्जित केला जात आहे; परंतु घणसोली परिसरात कचरा वेचताना वाहनचालकांना अडथळा ठरत आहे.

घणसोली परिसरात दोनशेपेक्षा जास्त बांधकामे सुरू आहेत, यासाठी लोखंडी शिगा, खडी, वाळू, विटा, सिमेंट रस्त्यावर, तसेच रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. यामुळे कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांना परिसरात कचरा गोळा करण्यासाठी फिरता येत नाही. परिणामी कचरा गोळा करता येत नाही. त्यामुळे घरातील कचरा नागरिक मोकळ्या जागेवर टाकत आहेत. यामुळे स्वच्छता अभियानाला बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकसुद्धा संताप व्यक्त करत आहेत.

व्यावसायिकांकडून रस्ता बंद
इमारतीवर स्लॅब टाकण्यासाठी व्यावसायिक मंडळींकडून रस्ताही बंद करण्यात येत आहे. सुटीच्या दिवशी म्हणजे शनिवारी, रविवारी रस्ता बंद करत आहेत. यामुळे कचरा वाहतूक करणारी गाडी फिरण्यास मज्जाव येत आहे.

वाहतुकीला अडसर होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच आमच्या विभागाकडून वारंवार कारवाई होत असते.
- महेंद्रसिंग ठोके, सहायक आयुक्त, पालिका

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82700 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..