८,५०६ इमारतींना महापालिकेच्या नोटिसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Municipal notices to 8506 buildings
८,५०६ इमारतींना महापालिकेच्या नोटिसा

८,५०६ इमारतींना महापालिकेच्या नोटिसा

मुंबई : मुंबईत मान्सूनपूर्व कामात वृक्षछाटणी करून अपघात कमी करण्याचे पालिकेचे लक्ष्य असते. त्या पार्श्‍वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पालिकेने वृक्षछाटणी मोहीम सुरू केली आहे. तसेच नियोजित उद्दिष्टांपैकी निम्म्या वृक्षांची छाटणी झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून दिसते. याशिवाय पालिकेने यंदा ८,५०६ खासगी तसेच सरकारी इमारतींना वृक्ष छाटणीबाबत नोटिसाही पाठवल्या आहेत.पावसाळ्यात झाडे व फांद्या पडून होणारी संभाव्य प्राण व वित्तहानी टाळण्यासाठी संबंधितांनी वृक्षछाटणीकरिता प्रभाग कार्यालयात अर्ज करावेत, असेही आवाहन महापालिकेने केले आहे.

पालिकेकडून रितसर परवानगी घेऊन वृक्षछाटणी करण्यात यावी, असे आवाहन नागरिकांना केले आहे. पालिकेकडे आवश्यक ते प्रक्रिया शुल्क भरल्यास पालिकेच्या उद्यान विभागामार्फतसुद्धा वृक्ष छाटणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे, असे उद्यान विभागाचे प्रमुख, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितले.

धोकादायक झाडांचे सर्वेक्षण

मुंबईत रस्त्यालगत १ लाख ८५ हजार ९६४ इतक्या मोठ्या प्रमाणात झाडे असल्याची आकडेवारी ही महापालिकेच्या वृक्ष गणनेनुसार आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात ४७३ मृत, धोकादायक आणि कीड लागलेली झाडे सर्वेक्षणादरम्यान आढळली. त्यापैकी ४४४ झाडांच्या फांद्या तसेच झाडे हटवण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली. मुंबईत रस्त्यालगतच्या झाडांच्या छाटणीसाठी १ लाख ५० हजार १५१ झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १ लाख २ हजार ७० झाडांची छाटणी करण्याची गरज मुंबई महापालिकेने प्रथमदर्शनी व्यक्त केली. आतापर्यत ४९ हजार १६७ झाडांची छाटणी करण्यात आली आहे.

कोणत्या विभागात सर्वाधिक नोटिसा?
मुंबई महापालिकेने यंदा मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ८,५०६ खाजगी, तसेच शासकीय आस्थापनांना उद्यान विभागाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. सर्वाधिक २,१९६ नोटिसा पाठवलेल्या वॉर्डामध्ये के वेस्ट म्हणजे अंधेरी भागाचा समावेश आहे; तर पी नॉर्थचा दुसरा क्रमांक आहे. या ठिकाणी १,५०० नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ पी साऊथ म्हणजे गोरेगाव येथे ७३० आणि भांडुप येथे ६०७ नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82744 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top