खेळाच्या मैदानात कचऱ्याचे साम्राज्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेळाच्या मैदानात कचऱ्याचे साम्राज्य
खेळाच्या मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

खेळाच्या मैदानात कचऱ्याचे साम्राज्य

sakal_logo
By

चेंबूर, ता. १८ (बातमीदार) ः कुर्ला येथील डॉ. एपीजे अब्दुल कलाम मैदानात कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक नागरिकांना साथीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. या मैदानात कित्येक महिन्यांपासून कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. महापालिकेकडून वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने परिसरात साथीचे आजार व डासांचे प्रणाम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असल्याने मुलांना खेळता येत नाही, तसेच ज्येष्ठ नागरिकांना मैदानात फिरताही येत नाही. महापालिका अधिकाऱ्यांनी तातडीने मैदानातील कचरा उचलावा, अशी मागणी समाजसेवक नदिम कप्तान मलिक यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82746 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top