
अनधिकृत माती उत्खननावर तहसीलदारांची कारवाई
मनोर, ता. १८ ः पालघर तालुक्यातील धुकटन गावात अनधिकृत मुरूम आणि माती उत्खननावर तहसीलदारांकडून कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता.१८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. यात जेसीबी मशिनसह मुरूम वाहतूक करणारे दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. अनधिकृत माती उत्खनन आणि वाहतुकीवर तहसीलदारांनी कारवाई केल्याने भराव माफियांचे धाबे दणाणले आहेत.
पालघर तालुक्यात मुंबई-दिल्ली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर, मुंबई-बडोदा द्रुतगती महामार्ग, बुलेट ट्रेन यांसारख्या राष्ट्रीय प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात माती आणि मुरूमचा भराव केला जात आहे. अनेक ठिकाणी माती आणि मुरूमाचे अनधिकृत उत्खनन करून शासनाचा महसूल बुडवून वाहतूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. धुकटन गावच्या बोडण पाड्यातील आदिवासी खातेदाराच्या शेतजमिनीमधून माती आणि मुरूमाचे अनधिकृतरित्या उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती तहसीलदार सुनील शिंदे यांना मिळाली होती. मंगळवारी दुपारी तहसीदारांनी धुकटनच्या बोडण पाड्यात छापा टाकला असता अनधिकृतपणे माती आणि मुरूमाचे खोदकाम केल्याचे आढळून आले. कारवाईदरम्यान खोदकाम केलेल्या मुरूमाची वाहतूक करीत असलेले दोन ट्रक जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेले ट्रक मनोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82764 Txt Palghar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..