
जिल्हा परिषदेच्या बदल्यांची प्रकिया सुरू
ठाणे, ता. १९ ः जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील आणि विविध संवर्गातील गट क पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या अध्यक्षतेखाली ही बदली प्रक्रिया समुपदेशनाद्वारे करण्यात येत आहे.
१५ मे २०१४ च्या सरकारच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबवली जाते. त्यानुसार यंदाची बदली प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आणि बुधवारी एन.के.टी महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या बदली प्रक्रियेच्या कार्यवाही दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे आणि विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82785 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..