पालिकेच्या प्रभाग कार्यालयात गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेच्या प्रभाग कार्यालयात गर्दी
पालिकेच्या प्रभाग कार्यालयात गर्दी

पालिकेच्या प्रभाग कार्यालयात गर्दी

sakal_logo
By

कल्याण, ता. १९ (बातमीदार) ः डिजिटल दुनियेचा गाजावाजा करणाऱ्या केडीएमसीच्या ऑनलाईन सुविधेचा बोजवारा उडाला असताना आता ऑफलाईन सुविधेचा बोजवारा उडाला असून पालिका क्षेत्रात १० प्रभाग क्षेत्र कार्यालय असताना तक्रार अर्जात आज ८ प्रभाग क्षेत्र कार्यालयाची नोंद असल्याने नव्याने निर्माण झालेल्या प्रभागातील नागरिकांनी तक्रारी करायच्या कुठे, असा सवाल केला जात असून पालिकेचा भोंगळ कारभार समोर येत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत सात वर्षांपूर्वी अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह असे आठ प्रभाग क्षेत्र कार्यालये होती; मात्र लोकसंख्या वाढल्याने नागरी सुविधा मिळावी, यासाठी नव्याने जे आणि आय या दोन प्रभाग क्षेत्र कार्यालयांची निर्मिती केल्याने एकूण १० संख्या झाली होती.

नागरिकाना घरबसल्या ऑनलाईन सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालिका मुख्यालयासहित प्रत्येक्ष प्रभाग क्षेत्र कार्यालयामध्ये नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आली. सध्या ऑनलाईन सुविधांबाबत अनेकांना तांत्रिक अडचणी येत असल्याने नागरिक ऑफलाईन वापर करत असल्याने पालिका मुख्यालयासहित नागरी सुविधा केंद्रांवर गर्दी करू लागले.

नागरी समस्यांसाठी विविध तक्रार अर्ज
पथदिवे, रस्ते, गटारे व सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबत तक्रार, रस्त्यांबाबत तक्रार, सार्वजनिक आरोग्याबाबत, मालमत्ता कर आकारणी व वसुलीबाबत, योग्य परवानगी आणि परवान्याशिवाय केलेली कृती, पाणीबिल तक्रार, मल आणि जलसंबंधित तक्रार, पाणीपुरवठ्याबाबत तक्रार, आदी नागरी समस्यांबाबत तक्रार करण्यासाठी प्रत्येक नागरी सुविधा केंद्रात ऑफलाईन तक्रार करण्यासाठी एक अर्ज उपलब्ध करून दिला असून त्या अर्जात पालिका क्षेत्रात १० प्रभाग क्षेत्र कार्यालये असताना त्या तक्रार अर्जात ८ प्रभाग क्षेत्र कार्यालयांचा उल्लेख असून जे आणि आय प्रभाग क्षेत्र कार्यालयाचा उल्लेख नसून त्या प्रभागातील नागरिकांनी काय करायचे, असा सवाल केला जात आहे.

मी जे / ४ प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत राहत असून मला पाण्याची आणि रस्त्यावरील कचऱ्याची तक्रार करायची होती. अधिकारीवर्गाला मेसेज करून तक्रार दूर होत नसल्याने ऑनलाईन सुविधाही ठप्प असल्याने नागरी सुविधा केंद्रात गेले; मात्र त्या तक्रार अर्जात माझ्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाचा उल्लेख नसल्याने तक्रार करायची कुठे, असा सवाल कल्याण पूर्वमधील अनिता पाटील या महिलेने केला आहे.

कोरोना काळात तक्रार अर्ज छापले नव्हते. लवकरच हे अर्जात बदल करण्यात येतील, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
६ Attachments

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82800 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top