कथा, काव्य, गप्पात रंगले रसिक श्रोते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथा, काव्य, गप्पात रंगले रसिक श्रोते
कथा, काव्य, गप्पात रंगले रसिक श्रोते

कथा, काव्य, गप्पात रंगले रसिक श्रोते

sakal_logo
By

प्रभादेवी, ता. १९ (बातमीदार) : कथा, काव्य आणि साहित्य या माध्यमातून विविध विषयांवर रसिकांच्या मनावर गोड शब्दांची हळूवार फुंकर घालत लेखिका, कवयित्री आणि साहित्यिक यांनी साधलेला संवाद आणि गप्पांत उपस्थित रसिक श्रोते रंगून गेले. अमर हिंद मंडळ आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या मंचावर चार दिग्गज महिलांनी श्रोत्यांना अक्षरशः आसनावर खिलवून ठेवले.
अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, ऑडिओलॉजिस्ट आणि व्हॉइस थेरपिस्ट सोनाली लोहार, संवादक, मुलाखतकार, निवेदक हर्षदा बोरकर, लेखिका, भाषा-साहित्य अभ्यासक, व्याख्याता डॉ. निमोही फडके यांनी त्यांच्या दर्जेदार लेखनातील गोडवा उलगडून सांगितला.
वैविध्यपूर्ण लिखाणातून या चारही लेखिकांनी एकत्र येऊन लिहिलेल्या ‘गुंफियेला शेला’ या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले असून या पुस्तकातून वाचकांना लिखाणाची संधी मिळेल, यातून नवीन साहित्याची निर्मिती होईल, असे संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले. या पुस्तकात चित्रांना महत्त्व देण्यात आले आहे. यात एक लाल रंगाचे टाईपरायटर आणि त्यापुढे चुरगळलेला एक कागद रेखाटण्यात आला आहे. या चित्रातून त्याचे बीज उमगून चारही जणींनी यावर २० वाक्यांच्या कथा लिहिल्या आहेत. पुस्तकातील पाचवे पान वाचकांसाठी राखीव ठेवण्यात आले असून त्यांनी हे पुस्तक घेऊन या कोऱ्या पानावर पुस्तकातील चित्रांवर लिखाण करावे, त्यातून चांगल्या लिखाणाची निर्मिती होईल, असे जोगळेकर यांनी सांगितले.
विशेषतः कोरोना काळात घडलेला प्रवास आणि तिथून पुढे चार सखींचा झालेला मिलाप यातून चौघींनी मिळून केलेले लिखाण याबाबतचे बारकावे हर्षदा बोरकर यांनी सांगितले.
...
प्रेम करणारी व्यक्ती हवी!
प्रेमाचे महत्त्व विशद करताना प्रेम व्यक्त करण्याची आणि स्वीकारण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते, मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेम करणारी व्यक्ती हवी, असे आपल्या ‘केशरिया’ या कवितेतून सोनाली लोहार यांनी सांगताच उपस्थितांनी त्यांना दाद दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82810 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top