
तांदूळ, आंबा महोत्सव
विद्याभवन शाळेत तांदूळ, आंबा महोत्सव
नेरूळ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान-उमेदच्या राज्यभरातील स्वयंसहाय्यता गटांच्या शेतातील उत्पादनाच्या आधारित तांदूळ आणि आंबा महोत्सव २०, २१ आणि २२ मे रोजी पुणे विद्यार्थी गृहाचे नेरूळमधील विद्याभवन शैक्षणिक संकुलामध्ये आयोजित केला आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतून ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांच्या शेतातील तांदळाच्या विविध जाती, सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस, केशर, पायरी इत्यादी प्रकारचा आंबा या महोत्सवात उपलब्ध असेल. उद्या (ता. २०) सकाळी या महोत्सवाचे उद्घाटन अभियानाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक गणेश मुळे, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक दिनेश मिसाळ, स्माईल फाऊंडेशनच्या उमा धीरज आहुजा आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.