राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून वसई-विरार पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाचे कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून वसई-विरार पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाचे कौतुक
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून वसई-विरार पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाचे कौतुक

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून वसई-विरार पालिकेच्या महिला बालकल्याण विभागाचे कौतुक

sakal_logo
By

विरार, ता. १९ (बातमीदार) ः वसई-विरार पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत अनाथ मुलांकरिता राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला. यावेळी अनाथ मुलांसाठी चांगले काम करणाऱ्या पालिकेचे कौतुक करतानाच पालिकेला प्रशस्तिपत्रक देऊन त्यांचा सन्मान करण्याची शिफारस त्यांनी महिला व बाल कल्याण विभागाला केली आहे.
महिला व बालविकास विभागाचे राज्य मंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात राज्यातील अनाथ बालकांच्या कल्याणार्थ व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वसई-विरार शहर पालिका, महिला व बालकल्याण विभागामार्फत अनाथ मुलांकरिता राबविण्यात येत असणाऱ्या विविध योजनांचा आढावा बच्चू कडू यांनी घेतला.

वसई-विरार महापालिकेच्या महिला बालकल्याण विभागाकडून दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत. आता पालिका हद्दीत असणाऱ्या दिव्यांगांच्या स्टॉलचा सर्व्हे करण्यास सांगितले आहे. सर्व्हे झाल्यावर सर्व राजकीय पक्ष आणि पधाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन दिव्यांगांना मालमत्ता करात काही सूट देता येते का, हे तपासून बघणार आहोत.
- अनिलकुमार पवार, प्रशासक तथा आयुक्त वसई-विरार पालिका.