शैलेश गांगोडा यांना मॅरेथॉन स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शैलेश गांगोडा यांना मॅरेथॉन स्पर्धेत यश
शैलेश गांगोडा यांना मॅरेथॉन स्पर्धेत यश

शैलेश गांगोडा यांना मॅरेथॉन स्पर्धेत यश

sakal_logo
By

सफाळे, ता. १९ (बातमीदार) ः लोणावळा येथे आयोजित ३५ किलोमीटर अंतराच्या टाटा अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ॲथलेटिक्स ग्रुप पालघरचे खेळाडू शैलेश गांगोडा यांनी बाजी मारत दुसरा क्रमांक पटकावला आहे. रविवारी (ता. १५) ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पोलिस आयुक्त कृष्णा प्रकाश यांच्या हस्ते झाला. यावेळी गांगोडा यांना १५ हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र अशा स्वरूपाचे बक्षीस प्रदान करण्यात आले. शैलेश गांगोडा यांना आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट स्नेहल संजय राजपूत हे प्रशिक्षण देतात.