Thur, March 23, 2023

नवी मुंबई महापालिकेकडून हटिंग्टन उपक्रम
नवी मुंबई महापालिकेकडून हटिंग्टन उपक्रम
Published on : 19 May 2022, 10:08 am
नेरूळ (बातमीदार) : हटिंग्टन या मेंदूवर परिणाम करणाऱ्या आनुवंशिक आजाराविषयी जागृती निर्माण करण्यासाठी नवी मुंबई येथे जागरूकता महिना पाळण्यात येत आहे. यामध्ये महापालिकेने महिनाभर विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. एचडी लाईट उपक्रमाचा भाग म्हणून महापालिका मुख्यालयावर निळ्या व जांभळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली आहे. हटिंग्टन हा मेंदूवर परिणाम करणारा असाध्य आनुवंशिक आजार आहे. रुग्णाचे शारीरिक हालचालींवर नियंत्रण नसणे, व्यक्तिमत्त्वाचा सामान्य नसणारे बदल, अपुरी आकलनक्षमता अशी लक्षणे या आजारात आढळतात. या आजाराविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी, रुग्ण व त्यांच्या कुटुंबांना आदर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मे महिना हा एचडी जागरूकता महिना पाळण्यात येतो. यामध्ये एचडी लाईट हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे.