
सीएसएमटी स्थानकात घातपात तपासणी
वडाळा, ता. १९ (बातमीदार) ः नागपूर रेल्वेस्थानकात मिळालेली स्फोटके, तसेच पुणे रेल्वेस्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याच्या अनुषंगाने आणि एकूण सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून गुरुवारी (ता. १९) सीएसएमटी रेल्वे टर्मिनस येथे काटेकोरपणे घातपात तपासणी करण्यात आली. सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक मेहेबूब इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान सीएसएमटी टर्मिनस येथे बाहेरून आलेली पार्सल, अडगळीच्या जागा, फूट ओव्हर ब्रिज, संशयास्पद वस्तूंची तपासणी करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक विजय चौगुले, सहायक पोलिस उपनिरीक्षक मंगेश साळवी, पोलिस हवालदार मंगेश आयरे, अनिल मगरे, पोलिस नाईक जगदीश गावित व रेल्वे सुरक्षा बल सीएसएमटीचे उपनिरीक्षक चांद राम बटोए, श्वान डॅनी, हँडलर बजरंग नागरगोजे आदींचा सहभाग होता.