Thur, March 23, 2023

‘ओबीसींना आरक्षणासाठी मंत्रीपदाचा राजीनाम द्या’
‘ओबीसींना आरक्षणासाठी मंत्रीपदाचा राजीनाम द्या’
Published on : 19 May 2022, 9:34 am
सरळगाव, ता. १९ (बातमीदार) ः महाविकास आघाडी सरकारच्या बेफिकिरीमुळे ओबीसी राजकीय आरक्षण राज्यात गमावले व ते पुन्हा मिळत नाही. सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी लाचारी सोडावी आणि ओबीसींना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी मुरबाड येथे केले. कथोरे म्हणाले, मध्य प्रदेशने न्यायालयाच्या आदेशानंतर ताबडतोब डेटा गोळा करून चाचणी पूर्ण केली व ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवले. मध्य प्रदेशमधील भाजप सरकारच्या यशानंतर महाविकास आघाडी सरकारचे अपयश पुन्हा स्पष्ट झाले आहे. या सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी आता तरी सत्तेची लाचारी सोडावी आणि सरकारवर दबाव आणण्यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची हिंमत दाखवावी.