Tue, May 30, 2023

पनवेलमधून तीस वर्षीय महिला बेपत्ता
पनवेलमधून तीस वर्षीय महिला बेपत्ता
Published on : 19 May 2022, 10:12 am
पनवेल (प्रतिनिधी) : करंबेळी, मोरबे येथील तीस वर्षीय महिला घरात कोणाला काहीही न सांगता कपड्याची बॅग घेऊन निघून गेली आहे. त्यामुळे ती हरवली असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली. सुकरी अर्जुन पारधी या महिलेची उंची दीडशे सेंमी, रंग निमगोरा, चेहरा उभट आहे. तिने अंगात गुलाबी रंगाची साडी, ब्लाऊज, गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत. तिच्या हातावर सुकरी अर्जुन पारधी असे गोंदविलेले आहे. या महिलेबाबत अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.