Sat, April 1, 2023

कोळी महिलांना कंटेनरचे वितरण
कोळी महिलांना कंटेनरचे वितरण
Published on : 19 May 2022, 12:03 pm
शिवडी, ता. १९ (बातमीदार) ः वाढत्या तापमानामुळे अनेकदा मासे खराब होण्याची शक्यता असते. मासे ताजे राहावेत व कोळी व्यवसायिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिवडीतील जी. एल. पाटील मंडईतील कोळी महिला व्यावसायिकांना महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत पर्यावरणपूरक मान्यताप्राप्त प्लास्टिक कंटेनर गुरुवारी (ता. १९) माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या वेळी युवा सेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव तसेच लाभार्थी कोळी महिला उपस्थित होत्या.