
निखिल भामरेला न्यायालयीन कोठडी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट करणाऱ्या निखिल भामरे याच्याविरोधात नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी (ता. १८) रात्री नौपाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन ठाण्यात आणले होते. निखिलला गुरुवारी (ता. १९) ठाणे न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. तेव्हा न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर निखिलला घेऊन पोलिस नाशिकला रवाना झाले.
मागील आठवड्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट पोस्ट केले होते. या पोस्टमध्ये शरद पवारांना उद्देशून धमकी देणारा वादग्रस्त मजकूर होता. निखिल भामरे नामक व्यक्तीने ही पोस्ट ट्विट केली होती. ‘वेळ आली आहे बारामतीच्या गांधी साठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची’ असे या पोस्टमध्ये लिहिले होते. या पोस्टचा स्क्रीनशॉट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. याप्रकरणी राष्ट्रवादी ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी नौपाडा पोलिसात फिर्याद नोंदवल्याने पोलिसांनी निखिल भामरेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. भामरे याला नाशिक पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी नौपाडा पोलिसांनी बुधवारी नाशिक येथून भामरे याचा ताबा घेतला. त्याला रात्री उशिरा ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर निखिलला गुरुवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी ठाणे न्यायालयाने निखिल भामरेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82895 Txt Thane
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..