
भिंतीखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू
तळा, ता. १९ (बातमीदार) ः तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींपैकी दोघांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर एकाला मुंबई येथे उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.
चरई आदिवासी वाडी येथे राहत असलेल्या सुनीता अशोक मुकणे या आपल्या चार मुलांसह घरात झोपल्या होत्या. गुरुवारी (ता. १९) पहाटे ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने त्या जाग्या झाल्या असता घराची भिंत कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. भिंतीखाली त्यांची मुले सुवर्णा, संतोष, तन्वी, तुषार अडकल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी तत्काळ मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी राहात असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले व त्यांनी ढिगारा बाजूला करून सर्व जखमींना बाहेर काढले. या वेळी डॉक्टरांना बोलावले असता डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेल्या सुवर्णा अशोक मुकणे (वय ८) हिला मृत घोषित केले.
Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82897 Txt Raigad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..