कोविडनंतर जेजे रुग्णालयात अवयवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोविडनंतर जेजे रुग्णालयात अवयवदान
जेजे रुग्णालयात पाच वर्षांनंतर अवयवदान

कोविडनंतर जेजे रुग्णालयात अवयवदान

अवयवदानातून वाचले चौघांचे प्राण, मुंबईतील १८ वे यशस्वी अवयवदान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई,ता.१९: मुंबईतील शासकीय सर जेजे रुग्णालयात कोविडनंतरचे पहिले अवयवदान पार पडले आहे. या अवयवदानातून जवळपास चौघांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. जेजे रुग्णालयात कोरोना काळात सरकारी रुग्णालयात अवयव दानाची प्रक्रिया थंडावलेली असताना जे.जे रुग्णालयाने चक्क रुग्णाकडून मृत्यूपश्चात छोट्या आतड्याचे दान करत नवा आदर्श निर्माण केला.

४३ वर्षीय ॲड. रिना बनसोडे या जेजे रुग्णालयात १५ मे तारखेपासुन दाखल होत्या. न्यूरोसर्जरी विभाग प्रमुथ डॉ. वर्णन वेलहो यांच्या पथकाअंतर्गत दाखल करण्यात आले होते. त्यांना १८ तारखेला रात्री उशिरा ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत माहिती देण्यात आली. अवयवदानाबद्दल नातेवाईकांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर जेजे अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे आणि इतर वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमने रुग्णाच्या अवयवदानाची प्रक्रिया केली. त्यानुसार, रुग्णाचे किडनी, कॉर्निया, हृदय, तसेच छोटे आतडे यांचे दान करण्यात आले.

मुंबईतील जेजे, ग्लोबल, कोकिलाबेन, नानावटी रुग्णालयातील गरजू रुग्णांना नियमानुसार अवयव देण्यात आले. विशेष म्हणजे मुंबईतील हे पहिलेच यशस्वीरित्या झालेले छोट्या आतड्याचे अवयव दान आहे. ज्या रुग्णालयात झालेले छोटे आतडे दिले त्या रुग्णालयातील गरजू रुग्णाला छोट्या आतड्याची गरज होती. त्याच्यावर हे आतडे प्रत्यारोपण झाल्याने त्याचा जीव वाचवण्यास मदत झाली. दरम्यान, कोविडनंतरचे सार्वजनिक रुग्णालयांमधील झालेले हे पहिले अवयवदान आहे.

रुग्णाचे नातेवाईक आणि सर्व विभागांमध्ये समन्वय साधत डॉक्टर्स मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. सापळे यांनी रुग्णाचे नातेवाईक आणि टीमचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Mumbai News