आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीत २०२४ बालकांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीत २०२४ बालकांची निवड
आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीत २०२४ बालकांची निवड

आरटीई प्रवेशाच्या प्रतीक्षा यादीत २०२४ बालकांची निवड

sakal_logo
By

ठाणे, ता. १९ (बातमीदार) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठी राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हातील २०२४ बालकांची निवड झाली आहे. या आरटीई प्रवेशाची प्रतीक्षा यादी राज्यस्तरावरून जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी २७ मे २०२२ पर्यंत पाल्याचा प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे.

प्रतीक्षा यादीतील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलोटमेंट लेटरची प्रिंट तसेच आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका अथवा महापालिकेच्या पडताळणी केंद्रावर जाऊन प्रथम पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करायची आहेत. तसेच प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाले असतील. परंतु फक्त एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी, अशी सूचना शिक्षण विभागातर्फे पालकांना देण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी संबंधित तालुका मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82929 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top