केतकी चितळे ऍट्रोसिटीच्या गुह्यात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केतकी चितळे ऍट्रोसिटीच्या गुह्यात अटक
केतकी चितळे ऍट्रोसिटीच्या गुह्यात अटक

केतकी चितळे ऍट्रोसिटीच्या गुह्यात अटक

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी गुरुवारी (ता. १९) न्यायालयाच्या परवानगीने ॲट्रोसिटीच्या गुह्यात अटक केली आहे. मार्च २०२० मध्ये केतकी चितळे हिने फेसबुकवरून बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. त्यानंतर काही आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी तिच्या या पोस्टवर आक्षेप घेऊन तिच्याविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

मार्च २०२० मध्ये केतकी चितळे हिने फेसबुकवरुन बौद्ध समाजाविषयी आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केली होती. केतकी चितळे हिने टाकलेल्या या पोस्टवर सूरज शिंदे याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई व महात्मा जोतीराव फुले यांच्याविषयी गलिच्छ भाषेत कमेंट केली होती. त्या वेळी नवी मुंबईतील सर्वच पक्षातील आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी केतकी हिच्या लिखाणाचा निषेध केला होता. तसेच केतकीसह इतरांविरोधात रबाळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी केतकी चितळेसह चार जणांविरोधात ॲट्रोसिटीसह जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुह्यात केतकी चितळे हिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र ८ महिन्यांपूर्वीच न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. वाशी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त टेळे यांनी गुरुवारी न्यायालयाच्या परवानगीने केतकी चितळे हिला रबाळे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रोसिटीच्या गुह्यात ठाणे कारागृहातून ताब्यात घेऊन अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. शुक्रवारी (ता. २०) तिला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सागितले. तसेच या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचेही सुरेश मेंगडे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82937 Txt Navimumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top