दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड
दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड

दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : स्पाईस जेटचे दिल्ली ते शिर्डी एसजी ९५३ हे विमान गुरुवारी शिर्डीऐवजी मुंबई विमानतळावर उतरवण्यात आले. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी खराब हवामानाचे कारण प्रवाशांना देण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. धावपट्टीवर विमान उतरवूनही प्रवाशांना विमानातच पाच तास बसवून ठेवण्यात आले. विमानतळावर सुविधांचा अभाव असल्याचा आरोपसुद्धा या वेळी प्रवाशांनी केला. संतप्त प्रवाशांचे व कर्मचाऱ्यांचे वादाचे व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले.

दिल्ली-शिर्डी या विमानाने गुरुवारी दिल्ली विमानतळावरून दुपारी २.५० वाजता उड्डाण केले. दुपारी ४.३० वाजता विमान शिर्डी विमानतळावर उतरणे अपेक्षित होते. विमान शिर्डीवरून अचानक मुंबई विमानतळावर वळवण्यात आले. विमान शिर्डीमध्ये न उतरवण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे; मात्र स्पाईस जेट विमान कंपनीकडून कधी खराब हवामान, तर कधी तांत्रिक बिघाडीचे कारण प्रवाशांना देण्यात आल्याचा आरोप प्रवाशांनी केला. प्रवाशांना योग्य कारण मिळत नसल्याने प्रवाशांनी विमानातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला; शिवाय संतप्त प्रवाशांनी व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर व्हायरल केले.

स्पाईस जेटचे दिल्ली ते शिर्डी एसजी ९५३ हे विमान खराब वातावरणामुळे मुंबई विमानतळावर वळवण्यात आले. प्रवाशांना शिर्डीपर्यंत रस्ता मार्गाने पोहोचवण्याचा पर्यायही प्रवाशांना देण्यात आला आहे. आमच्यासाठी प्रवासी, कॅबिन कर्मचारी आणि विमानाची सुरक्षा सर्वतोपरी आहे.
- प्रवक्ते, स्पाईस जेट