कर्जत तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जत तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून
कर्जत तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून

कर्जत तालुक्यात तरुणाचा निर्घृण खून

sakal_logo
By

कर्जत, ता. २० (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील खाड्याचा पाडा येथे सुभाष खाडे या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलिस उपविभागीय अधिकारी विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली नेरळ पोलिस करीत आहेत.
गुरुवारी रात्री सुभाष खाडे हा घरी उशिरापर्यंत आला नसल्याने त्याचा मोठा भाऊ गणेश खाडे याने सुभाषचा शोध घेतला असता तो खाड्याचा पाडा येथे मृतावस्थेत आढळून आला. त्याने त्वरित नेरळ पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. नेरळ पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत गुन्ह्याचा तपास सुरू केला. या तपासादरम्यान सुभाषबरोबर त्याचे जवळचे दोन मित्र रात्री दारू प्यायला बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्‍या मित्रांकडे चौकशी केली असता, गाडीतून आलेल्‍या काही व्यक्तींनी सुभाषवर हल्ला केला, असे त्‍यांनी सांगितले. मात्र, मित्रांच्या बोलण्याचा आणि वागण्याचा संशय आल्याने त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच मोतीराम वाघ आणि शंकर वाळवी यांनी गुन्हा कबूल केला. या हत्येमागचे ठोस कारण अद्याप उघड झाले नसले, तरी या हत्येमागे प्रेमप्रकरणाची किनार असल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82964 Txt Thane

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top