दादर येथील सिग्नल यंत्रणा बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दादर येथील सिग्नल यंत्रणा बंद
दादर येथील सिग्नल यंत्रणा बंद

दादर येथील सिग्नल यंत्रणा बंद

sakal_logo
By

धारावी, ता. २१ (बातमीदार) : दादर पश्चिम येथील टिळक पुलावरील वनमाळी हॉल चौकातील सिग्नल यंत्रणा बंद असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून येथील सिग्नल यंत्रणा बंद आहे. मात्र वाहतूक विभाग याकडे लक्ष देत नसल्याबद्दल पादचारी संताप व्यक्त करत आहेत.
छबिलदास शाळेच्या गल्लीतून प्लाझा सिनेमा व वीर भाई कोतवाल उद्यानाकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवरून टिळक पुलावर वनमाळी हॉल चौक लागतो. या चौकात वाहतूक विभागाने सिग्नल यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यास मदत होत होती. पण गेल्या अनेक दिवसांपासून ही यंत्रणा बंद आहे. खोदादाद सर्कलकडून येणारी वाहने भरधाव वेगाने येतात. त्यांना चुकवून रस्ता ओलांडावा लागत आहे. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले, अपंग यांना रस्ता ओलांडताना इतरांची मदत घ्यावी लागते. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच वाहतूक विभाग या समस्येकडे लक्ष देणार का, असा प्रश्न पादचारी विचारात आहेत. वाहतूक विभागाने लवकरात लवकर सिग्नल दुरुस्त करून पूर्ववत करावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Mum22g82998 Txt Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..